ताज्या बातम्या

होळीच्या दिवशी मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाने केली आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2022 Maharashtra News :- धुलीवंदनानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातून एक दुखःद घटना समोर आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात होळीच्या दिवशी एका तरुणाने मोबाईलवर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करत एका आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दरम्यान सुनील ढगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कन्नड तालुक्यातील एका निर्जनस्थळी बसून व्हिडीओ बनवत दोन बाटल्या विषारी औषध प्राशन करत तरुणाने आत्महत्या केली.

तरुणाचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विष प्राशन केल्याने काही वेळातच त्याचा जीव गेला. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office