अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेमभंगातून सातपूर काॅलनीतील युवकाने स्वत:वर गाेळी झाडून अात्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातपूर काॅलनीतील रोहित राजेंद्र नागरे ( २८) असे मृताचे नाव आहे.
राेहित आपली आई व भावासह राहत हाेता. शुकवारी रात्री बारा वाजता काेणाला काहीही न सांगता ताे घराबाहेर पडला होता. शनिवारी सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागे असलेल्या भवर मळा परिसरातील नाल्याशेजारील रस्त्याच्या कडेला रोहितचा मृतदेह आढळून आला.
त्याच्या छातीत गोळी लागलेली असून त्याच्या मृतदेहाजवळ देशी बनावटीचे पिस्टल तसेच पडून हाेते. दरम्यान, त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला प्रेमभंगाचे संदेश होते.