अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- नातेवाईकांकडून झालेल्या आर्थिक त्रासाला कंटाळून एका ४० वर्षीय युवकाने राहत्या घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील येवती या गावात घडली.
ग़ौतम भानुदास आढाव असे त्या मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव, जिजाबाई पोपट आढाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबात अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील येवती येथील गौतम भानुदास आढाव या युवकाची येवती येथे दीड एकर शेती भावकितील लोकांनी फसवणूक करुन खरेदी केली.
घेतलेली जमीन माघारी परत देण्यासाठी झालेल्या बैठकीत त्यांनी २१ लाख रुपये एक महिन्यात द्या, नाही तर तुम्हाला जमिन परत देणार नाही तसेच उरलेली जमिन पण आम्हालाच द्या.
असे म्हणुन वेळोवेळी त्रास दिल्याने त्यांच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळुन तसेच आपली जमिन परत मिळणार नाही, हा मनात विचार करुन काल सकाळी राहत्या घराच्या पाठीमागे झाडाला फाशी घेत आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिट्ठी लिहुन ठेवुन मोबाईलवर मेसेज टाकत रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव,
जिजाबाई पोपट आढाव हे आत्महत्येस कारणीभूत असल्याचे कळविले. प्रकरणी मयतची पत्नी छाया गौतम आढाव हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.