अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- नगर- जामखेड रोडवरील दशमीगव्हाण ((ता. नगर) शिवारात कार व दुचाकीची धडक होऊन दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला आहे.
आकाश विजय जेधे (वय 24 रा. दत्तनगर, श्रीरामपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कार चालक नवनाथ माधव ठोंबरे (रा. देऊळगाव घाट ता. आष्टी जि. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अशिष राजेश कर्डक (रा. वार्ड नं. 1, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात नवनाथ ठोंबरे व इतर तिघे जखमी झाले आहेत.
आकाश जेधे त्यांच्या दुचाकीवरून नगर- जामखेड रोडने प्रवास करत असताना कार चालक ठोंबरे याने दशमीगव्हाण शिवारात रॉग साईटने कार चालवून आकाश यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या आकाश यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादी म्हटले आहे.