ताज्या बातम्या

Sleeping pattern : तुमचाही मेंदू म्हातारा होत नाही ना? करत असाल ‘ही’ चूक तर वेळीच सावध व्हा! नाहीतर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Sleeping pattern : धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष न दिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. यातील काही आजार हे जीवघेणे असतात. अनेकजण नोकरीवरून रात्री उशिरा येतात तर काहीजण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसतात.

तर काहीजण रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन पाहत बसतात. रात्रीच्या वेळी जर झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम थेट तुमच्या मेंदूवर होतो. यावर तज्ज्ञांनी अभ्यास केला सून त्यांच्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे ही माहिती पाहुयात.

काय आहे अभ्यासातून समोर आलेली माहिती

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये अशी माहिती दिली आहे की जर तुम्ही रात्री जागरण केले तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या मेंदूवर होत आहेत. 18 ते 39 वर्षे वयोगटातील 134 लोकांमध्ये एक संशोधन केले असून ज्यात कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅनद्वारे ‘मेंदूच्या वयाचा’ अंदाज लावण्यात आला आहे.यासाठी मेंदूसाठी लर्निंग मशीनचा वापर केला आहे. हा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

रात्री जागल्याने मेंदू म्हातारा होतो?

याबाबत तज्ज्ञांचे असे मत आहे की दीर्घकालीन झोपेची कमतरता मेंदूच्या आकारविज्ञानात वृद्धत्वाच्या दिशेने बदल घडवून आणते आणि हे बदल रिकव्हरी स्लीपमुळे उलट होतात. कारण आमचा अभ्यास वृद्धत्वावर झोपेच्या कमतरतेचे मेंदूवर होणारे परिणाम स्पष्ट करण्यासाठी नवीन पुरावे प्रदान करतो. म्हणजेच, जर तुम्ही दररोज रात्री उठत असाल तर ते तुमच्या मेंदूसाठी चांगले नाही. कारण रात्री जागरण केल्याने मेंदू वृद्ध होण्याची शक्यता आहे

शांत मनासाठी झोप गरजेची

दुसरीकडे, या विषयावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण पुरेशा झोपेनेच स्मरणशक्ती आणि विचार वाढतात. पण झोप पूर्ण झाली नाही किंवा झोपेत अडथळा येत असल्यास ते शरीरासाठी योग्य नाही.

कारण झोपेमुळे मेंदूला स्वतःची पुनर्रचना करण्याची क्षमता मिळते. हेच कारण आहे की झोप शरीरातील बहुतेक हार्मोनल प्रणाली आणि अवयवांच्या क्रियाकलापांना पुनर्संचयित करण्यात मदत करते. म्हणूनच पुरेशा झोपेला खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे, जर तुम्ही रात्री जागे असाल तर तुम्ही तुमच्या मनाला पुरेशी विश्रांती देत ​​नाही. त्यामुळे रात्री पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.

Ahmednagarlive24 Office