Credit Card : तुमचेही क्रेडिट कार्ड रद्द होऊ शकते, चुकूनही करू नका ‘या’ चुका

दिवसेंदिवस आता क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी नक्की वाचाच नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो.

Credit Card : क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले असून लोनसाठी क्रेडिट कार्ड फायदेशीर असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्रेडिट कार्ड सिबिल स्कोअर सुधारला जातो. परंतु, क्रेडिट कार्ड चालू ठेवण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्ही हे नियम आणि अटी मोडल्या तर तुमचे क्रेडिट कार्ड रद्द केले जाऊ शकते. इतकेच नाही तर त्यावर तुम्हाला पेनल्टी आकारली जाऊ शकते. यामुळे तुमच्या सिबिल स्कोअरवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ही चूक टाळण्यासाठी तुम्ही काही चुका टाळाव्यात.

गैरवापर करण्याची परवानगी नसते

Advertisement

मागील काही वर्षांपूर्वी, आशिषने एनपीएसच्या टियर 2 खात्यात प्रत्येक महिन्याला 4 लाख रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. तो फक्त काही महिन्यांसाठीच गुंतवणूक चालू ठेवू शकतो. NPS ही निवृत्ती योजना असून गुंतवणुकीवर कर कपातीचीही सुविधा उपलब्ध आहे.

यात दोन खाती आहेत – टियर-1 आणि टियर-2. टियर-1 ला लॉक-इन कालावधी असतो. त्याचे पैसे निवृत्तीपूर्वी काढता येतात. NPS च्या टियर-1 गुंतवणूकदाराला NPS-2 मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचे व्यवस्थापन टियर-1 सारखे आहे, मात्र लॉक-इन कालावधी उपलब्ध नाही.

आशिषने त्याच्या क्रेडिट कार्डचा वापर करून NPS-2 मध्ये गुंतवणूक केली आहे. त्याला या व्यवहारावर रिवॉर्ड पॉइंट मिळाले आहेत. काही वेळाने त्याने NPS-2 मधून पैसे काढले आहेत. त्या पैशातून क्रेडिट कार्डचे बिल भरले.यामध्ये त्याला फक्त नाममात्र व्यवहार शुल्क भरावे लागले आहे. पण, त्या बदल्यात त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स मोफत मिळाले. मात्र बँकेने हा व्यवहार आपल्या रिवॉर्ड पॉलिसीचे उल्लंघन मानला जात आहे. त्यामुळे त्यांनी आशिषचे क्रेडिट कार्ड रद्द केले.

Advertisement

वेळेवर पैसे भरणे गरजेचे

जर तुम्ही सतत बिल चुकवत असल्यास बँक काही काळानंतर तुमचे क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असते. बँकेला क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून व्याज आणि शुल्काच्या स्वरूपात महसूल मिळतो. याचा विलंब शुल्काचा बँकांच्या रोख प्रवाहावर परिणाम होतो. जर तुम्ही देय तारखेनंतर सतत पेमेंट करत असल्यास त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होतो.

गरज नसतानाही अधूनमधून वापर करा

Advertisement

जर तुम्ही ठराविक कालावधीसाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरत नसल्यास बँक तुमचे क्रेडिट कार्ड रद्द करण्याची शक्यता आहे. साधारणपणे, क्रेडिट कार्ड वर्षभर न वापरल्यास बँका रद्द करत असतात. त्यामुळे कधी गरज नसतानाही तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करा. जर तुम्ही बिल भरण्यास विसरला तर, तुम्ही ऑटो बिल पे पर्याय वापरू शकता.

जास्त खर्च करणे

ग्राहक क्रेडिट कार्डचा किती वापर करतात यावरही बँकाचे लक्ष असते. क्रेडिट कार्डचा जास्त वापर म्हणजे त्या व्यक्तीकडे रोख रक्कम कमी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्तर मर्यादेच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करते असते तेव्हा बँका सतर्क होतात.

Advertisement

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर ते वापरताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याच्याशी निगडित अनेक सुविधा आणि धोके आहेत. त्यामुळे केवळ क्रेडिट कार्ड घेणे पुरेसे नाही. त्याचा योग्य वापरही महत्त्वाचा आहे.