अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.
भाऊसाहेब घनवट असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा कारण अद्याप स्पष्ट नाही. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.
सदर युवक कपाशीचा व्यापार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
गळफास घेतलेल्या युवका कडे सुसाईड नोट होती का?, पोलिसांनी ती ताब्यात घेतली किंवा नाही असे प्रश्न यावेळी नागरिक पोलिसांना विचारत होते.
मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे.