अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगर शहरात होते, व त्यातच युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांचा वाढदिवसाचे निमित्त यावेळी नामदार बाळासाहेब थोरात , आमदार डॉ. तांबे, आमदार लहू कानडे यांनी पाटोळे यांचा सत्कार करून वाढिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या , मयूर पाटोळे हे नगरशहरात युवक काँग्रेसचे उत्तम काम करत आहे,
मयूर प्रामाणिक व निष्ठावंत असल्यामुळे काँग्रेसमध्ये त्याचे उज्वल भविष्य आहे अशा उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा सहित आशीर्वाद मंत्री थोरात यांनी दिला
व तसेच सर्वसामान्य युवक कार्यकर्त्यांना देखील काँग्रेस पक्षातच भविष्य घडविण्याची संधी आहे असे मत यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
मयूर काँग्रेस मध्ये वयाने सर्वात लहान व लाडका आहे ,भविष्यत पक्ष संघटनेत आणखी मोठे काम कर अासे डॉ. तांबे यांनी यावेळी म्हंटले , तसेच अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,
जिल्हा समन्वक ज्ञानदेव जी वाफारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष भैय्या वाबळे, शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेजा,अभिजीत लूनिया, गणेश भोसले, आदी काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते.