विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- संगमनेर मध्ये विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या अमोल दत्तात्रय शेळके (३५, शेळकेवाडी) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोलला खासगी रुग्णालयात दखल केले,

मात्र त्याचा मृत्यू झाला. देविदास शेळके यांच्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अहमदनगर लाईव्ह 24