अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- पाच लाख खंडणीसाठी एका विवाहित तरुणाचे अपहरण केले होते. पोलिसांनी या तरुणाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी या संपूर्ण कटाच्या सूत्रधार असलेल्या महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव बस स्थनाकावरून येथून सचिन वसंत जाधव यांचे प्रमिला पवार यांच्या सांगण्यावरून दोन अनोळखी पुरुष व एक महिला यांनी बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी पळवून नेले.
हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी कोपरगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्याचा तपास सुरू केला व घरात डांबून ठेवलेल्या या तरुणाची सुटका केली.
या गुन्ह्यात प्रमिला महेश पवारसह तिच्या एकनाथ भाऊसाहेब हाडवळे, भाऊसाहेब विठ्ठल काळे, प्रवीण रबाजी खेमनर, सीमा भाऊसाहेब काळे या चार साथीदारांना अटक करून त्यांच्याकडील
पांढऱ्या रंगाची सहा लाख रुपये किंमतीची ईटीका कार व १० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा सहा लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कोपरगाव शहर पोलिसांनी ही धाडसी कामगिरी केली.