गेली पाच वर्षे तुम्ही आडवे आलात, आम्ही तसे वागणार नाहीत- कोल्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोपरगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली पाच वर्षे आम्ही विविध प्रकारचा निधी आणून विकासकामे केली, जनहिताच्या कामांना प्राधान्य देत असतांना

कोपरगाव वासीयांच्या पिण्याच्या पाण्याच्या कामात आपण पडदयाआडून खोडा घालत होता, जनतेच्या जिव्हाळयाच्या प्रश्नात आपण राजकारण केले, गेली पाच वर्षे तुम्ही आडवे आलात, परंतु आम्ही तुमच्यासारखे निश्चितच वागणार नाही.

असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केले. कोपरगाव शहराला वारंवार जाणवणारी पाणी टंचाई जाणवत असते. शहरवासीयांना चार-चार,आठ-आठ दिवस पाणी येत नाही.

त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. श्री साईबाबा जन्मशताब्दीच्या निमित्ताने जागतिक किर्तीचे देवस्थान शिर्डी येथे निळवंडे धरणातून येणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन आणण्याचे तत्कालीन सरकारने निष्चित केले.

कोपरगाव वासियांच्या पाण्याच्या समस्येंचा विचार करता ही पाईपलाईन पुढे कोपरगाव पर्यंत आणण्यात यावी म्हणून विधानसभेत मंजुरी मिळवली. श्री साईबाबा संस्थानच्या खर्चाने होणारी ही पाईपलाईन कामास मंजुरी मिळवून त्यासाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतांना जनतेची दिशाभुल करण्याचे काम आपण केले.

वास्तविक निळवंडे धरणाच्या पिण्याच्या पाण्याच्या आरक्षण कोटयातुन हे पाणी कोपरगाव करांना मिळणार होते, त्यासाठी बिगर सिंचन आरक्षणही मंजुर झालेले आहे, कोपरगाव करांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होउन

शहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार होता, परंतु सत्तेच्या हव्यासापायी आपण लाभक्षेत्रातील शेतक-यांना न्यायालयात जाण्यास भाग पाडले, खोटया केसेस करायला लावुन आर्थीक रसद पुरविण्याचे काम केले.

त्यामुळे श्री साईबाबांच्या कृपने आणि तत्कालीन सरकारच्या सहकार्याने कोपरगावकरांची तहान भागवू नये, असेच प्रयत्न केले. हे महापाप आपण करून खाणेरडी राजनिती केली. मतदार संघातून समृध्दी महामार्ग जात आहे,

त्यानिमित्ताने होणारी स्मार्ट सिटी आपल्या राजकीय द्वेषापोटी दुसरीकडे घालविली, पर्यायाने हजारो युवक बेरोजगार राहिले. अनेक कुटूंबापुढे उपासमारीचे संकट उभे राहिले. मतदार संघातील युवक नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे. या युवकांचा रोजगार बुडविण्याचे काम आपण केले.

मतदार संघाच्या विकासासाठी कोटयावधीचा निधी आणून कामे करत असतांना स्वतःच्या राजकारणासाठी काही मतलबी लोकांच्या टोळीला हाताशी धरून माझेवर बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानली.

विकासाच्या कामाला आडवे येउन त्यात खोडा घालण्याचे काम केले. ऐतिहासिक नगरी असलेल्या कोपरगाव शहराचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी आणि कलाकारांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी

नाटयरसिकांच्या मागणीखातर शहरामध्ये अदययावत बंदिस्त नाटयगृह उभारण्यासाठी निधी मिळविला, नाटयगृहासाठी येवला रोड लगतची पाटबंधारे विभागाची सुमारे एक एकर जागा उपलब्ध केली. परंतु आम्ही मंजुर केलेले काम होउ नये म्हणून नाटयगृहाचे काम केले नाही.

ती रक्कम आपण दुसरीकडे वळविली. राजकारण बाजुला ठेवून विकासासाठी एकत्र या, अशी वल्गना आपण नुकतीच केली. याबाबत आम्ही निश्चितच समाधान व्यक्त करतो, परंतु गेल्या पाच वर्षात हे कृतीत आणले असते तर निळवंडेचे पाणी कोपरगाव करांपर्यत पोहचले असते.

कोपरगावकरांची तहान भागली असती. पण आपण पदाच्या आणि खुर्चीच्या मोहापायी आपण या पुण्ण्याच्या कामाला आडवे आले. हीच प्रवृत्ती मतदार संघातील विविध कामांमध्ये आडवी आली. आणि मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले.

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी दिलेला जनसेवेचा वारसा आजही आम्ही जपत आलो आहे, खुर्ची असो वा नसो सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कायम जनतेच्या सेवेत असणारातले आम्ही आहोत.

आणि आपण मात्र राजकीय अट्टाहासापायी तालुक्यातील स्मार्ट सिटी घालवून युवकांना रोजगारापासून वंचित ठेवले.नाटयगृहाचे काम प्रलंबित ठेवून नाटयरसिकांच्या तोंडाला पाने पुसली. आपल्या या कृत्यामुळे कोपरगावच्या जनतेची मात्र तहान भागली नाही.

या निमित्ताने एवढेच सांगते, तुम्ही कोपरगाव करांना रोज शुद्ध पाणी दया, तुम्ही जसे गेली पाच वर्षे विकासकामात आडवे आले, तसे आम्ही निश्चितच आडवे येणार नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24