Maharashtra : यूहीं चला चल राही…. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर देवेंद्र फडणवीसांनी चालवलेल्या गाडीची किंमत किती; पहा व्हिडीओ

Maharashtra : नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या द्रुतगती मार्गावर स्वतः गाडी चालवत प्रवास केला. मात्र फडणवीसांनी चालवलेल्या गाडीची किंमत तुम्हाला माहिती नसेल.

एक्सप्रेसवेला अधिकृतपणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. महामार्गाचे पूर्ण नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असून त्याचे एकूण अंतर ७०१ किमी आहे. 49,250 कोटी रुपये खर्चून बांधलेले हे 10 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 392 गावातून जाते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करतील, असे ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. ते पुढे म्हणाले की, आज उपमुख्यमंत्र्यांसमवेत मी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला.

कारमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शेजारी मुख्यमंत्री शिंदे बसले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि काही अधिकारी उपस्थित होते. पीएम मोदी येत्या रविवारी नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे जनतेसाठी खुला करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या कारचे नाव बेन्झ जी-क्लास आहे. ही गाडी मर्सिडीज कंपनीची आहे. तिची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. जाणून घ्या या गाडीची खासियत.

ही गाडी ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तिचा गिअर बॉक्स हा ऑटो टीसी प्रकारचा आहे. या गाडीच्या पेट्रोल वेरियंटचं नाव जी63 एएमजी 4मेटीक असे आहे. या गाडीची किंमत 2.55 कोटी इतकी आहे. तर डिझेल वेरिअंटचे नाव जी 350डी 4मेटिक असे आहे आणि तिची किंमत 1.72 कोटी रुपये इतकी आहे.

या किंमती एक्सशोरूम असून ऑन रोड किंमत त्यापेक्षा जास्तच असणार आहे. त्यात इन्शूरन्स, रोड टॅक्स आणि इतरही काही गोष्टींचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे या गाडीची किंमत 3 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते, असं जाणकार सांगतात.

ही गाडी फोर व्हील ड्राईव्हमध्येही मिळते. 2925 ते 3982 सीसी पर्यंतच्या इंजिनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. 288 ते 577 बीएचपी इतकी जबरदस्त पॉवर या गाडीत असून 600 ते 850 न्यूटन मीटर इतका टॉर्क या गाडीत आहे.