झहीर खान लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन मुनाफ पटेलपासून सुंदर पिचाई यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या जन्मभूमीबद्दल कणव दाखवत मदतीचा हात दिला.

मात्र, श्रीरामपूर जन्मभूमी असलेल्या भारतीय संघाचा निवृत्त क्रिकेटपटू झहीर खान याने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ‘लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!’ अशा शब्दात त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

श्रीरामपुरात तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू असतांना, सर्वत्र रूग्ण, ऑक्सिजन, इंजेक्शन, औषधांचा तुटवडा असतांना एकमेव आशेचा किरण म्हणून झहीर खानकडे पाहिले जात आहे.

मदतीसाठी सर्व श्रीरामपूरकर आपल्या लाडक्या भूमिपुत्रास हाक देत आहेत. तुझाच सहयोगी खेळाडू मुनाफ पटेल गुजरातमधील त्याच्या गावी कोरोनाच्या साथीशी लढा देतांना स्वखर्चाने कोविड सेंटरमध्ये सेवा करत आहे.

झहीर, तू ज्या मातीत क्रिकेटचा सराव केला, संगोपन, शिक्षण केले, त्या मातीला विसरला. क्रिकेट अकॅडमी उघडण्याचा तू दिलेला शब्द पाळला नाहीस.

तुला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी एक राजकीय कार्यक्रम म्हणून तु सत्कार स्वीकारण्यासाठी आला नाहीस.

आम्ही समजून घेतले. परंतु तु आता कोरोना काळात देखील श्रीरामपूरकराच्या सुख-दुःखात सामील झालाच नाही.

याचे दुःख वाटते. श्रीमपूरच्या तरुण खेळाडूंचे भविष्य घडवू शकला नाहीस. निदान या आपत्तीत मदतीचा हात देऊ शकतोस, अशी विनंती फेसबुकच्या माध्यमातून झहीर खान याला केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24