जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे जिल्हापरिषदेची कोट्यवधींची थकबाकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतींना विविध कारणांसाठी कर्ज दिले जाते. देण्यात येणारे हे कर्ज हे दहा वर्षात समान हप्त्यात फेडाची अट आहे.

मात्र, जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींची ही मुदत संपली असून त्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर मेहरबान आहे. जिल्हा परिषदेने दहा वर्षांच्या मुदतीपेक्षा जास्त मुदत झालेल्या जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकविले आहे.

या ग्रामपंचायतींकडून कर्ज वसूल करण्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, 10 वर्षांच्या आत थकीत कर्ज असणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या 37 यांना साडेपाच कोटींचे कर्ज दिले परंतु त्याची सरासरी वसुली केवळ 14 टक्के असल्याचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत समोर आले आहे.

जिल्हा परिषदेकडून या कर्जाच्या वसुलीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप काही जिल्हा परिषद सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केला.

त्यावर ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित ग्रामपंचायतींना दंडाच्या नोटिसा पाठवल्याबाबत सांगितले. मात्र, या ग्रामपंचायतींकडून प्रत्यक्षात कधी वसुली होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

या ग्रामपंचायतींकडील थकबाकीचा आकडा हा एक कोटीहून अधिक आहे. यात अकोले तालुक्यातील 2, कोपरगाव तालुक्यातील 3, नगरमधील 5, श्रीगोंदा 2, पाथर्डी 1, श्रीरामपूर 1, कर्जत 2, पारनेर 2, राहुरी 2 यांचा समावेश आहे. तर 37 ग्रामपंचायतींना दिलेल्या कर्जाची मुदत अद्याप दहा वर्षाच्या आत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24