Zodiac Sign : ज्यावेळी एखादा ग्रह संक्रमण आणि नक्षत्र बदलत असतो त्यावेळी त्याचा 12 राशींवर प्रभाव पडतो. हा परिणाम काही राशींवर चांगला परिणाम होतो तर काही राशींवर याचा वाईट परिणाम होतो. हे लक्षात घ्या की 15 ऑक्टोबरलाच बुध आणि शनि यांनी धनिष्ठ नक्षत्र बदलले आहे.
शनीच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशी सकारात्मक तर काही राशींचा त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार शनिसोबत बुधही चित्रा नक्षत्रात आहे. शनि आणि बुधाच्या चालीमुळे 3 राशींना वर्षभर लाभ होणार आहे.
सिंह रास
या काळात शनि आणि बुधाच्या राशीतील बदलामुळे सिंह रास असणाऱ्या लोकांना खूप आत्मविश्वास मिळेल. या राशीचे लोक कठोर परिश्रम करत आहेत त्यांना आश्चर्यकारक फायदे मिळतील. तसेच त्यांचे वैवाहिक जीवनात आनंद राहील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना खूप व्यवसायात नफा मिळेल.त्यांना नवीन प्रकल्प उपलब्ध होऊ शकतील. परंतु हे लक्षात ठेवा की तुमचे खर्च वाढू शकतील.
मकर रास
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मकर रास असणाऱ्या लोकांना शनि आणि बुध नक्षत्र बदलल्यामुळे चांगले परिणाम मिळतील. तसेच, या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनात संयम राखण्याचा प्रयत्न करावा. इतकेच नाही तर व्यक्तींना शैक्षणिक कार्यातही चांगले परिणाम प्राप्त होतात. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या पगारात खूप वाढ होऊ शकते.
कर्क रास
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कर्क रास असणाऱ्या लोकांना शनि आणि बुध नक्षत्र बदलल्यामुळे विशेष लाभ होऊ शकतो. या व्यक्तीला मानसिक तणावातून आराम मिळून त्यांना शांतीही मिळू शकते. असे मानले जाते की शनि आणि बुध नक्षत्र बदलले तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. इतकेच नाही तर नोकरदार लोकांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. त्याशिवाय व्यवसायात मोठे बदल होऊ शकतील.