file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :-  नगर शहराला पाणीपरुवठा करणाऱ्या नवीन ८१३ व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला विळद जवळ सोमवारी दुपारी गळती लागली आहे.

नगर-कोपरगाव महामार्गाचे काम खासगी ठेकेदारामार्फत सुरू असताना पोकलेन मशिनचा धक्का लागून या वाहिनीचे नुकसान झाले आहे.

या वाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सावेडी उपनगरातील ढवणवस्ती, स्टेशन रोड, विनायकनगर, माणिकनगर,

आगरकर मळा या भागाला मंगळवारी (१६ नोव्हेंबर) पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,

दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चाैक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर काॅलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हडको, म्युनिसीपल हाडको, विनायकनगर,

आगरकर मळा या भागाला बुधवारी (१७ नोव्हेंबर) पाणीपुरवठा होईल. तर सर्जेपुनरा, तोफखाना, सावेडी, बालिकाश्रम रोड, नगर-कल्याण रोड परिसर, सारसनगर, बुरूडगाव, या भागाला गुरूवारी (१८ नोव्हेंबर) पाणीपुरवठा होणार आहे.