अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस आधीपासूनच सर्व सुरक्षा व्यवस्था पाहून, गुप्तचराकडून परिसरातील माहिती घेऊन सगळी व्यवस्था करण्यात येते.

तरी देखील पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या. एसपीजी हे गृह खात्याअंतर्ग असून, गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणेचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहा यांचा हात तर नाही ना ?

असा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. या वेळी बोलताना पटोले म्हणाले की, मोदी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी नाराज असल्यामागे मोदींनी शेतकऱ्यांना आतंकवादी, दहशतवादी आणि आदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच ”आम्हाला सिरीयसली घेऊ नका, आम्ही शेतकऱ्यांची मूल आहोत ठरवलं तर मतदार व शेतकरी तुम्हाला घरी बसवू शकतात” असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पटोले यांच्यावर टीका करत म्हणाले की, नाना पटोलेंना कधी कोणी सिरिअसली घेत नाही,

ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांचं बोलणं ऐकतो. पण ते कधीच सिरिअसली नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी सिरिअसली पाहत नाही.