Healthy Diet : चुकूनही एकत्र खाऊ नका “या” गोष्टी; अन्यथा आरोग्यावर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Healthy Diet : निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे, पण सध्याच्या या धावपळीच्या जगात योग्य आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. योग्य आहार आपल्याला चांगले तसेच निरोगी आयुष्य देते. आजच्या या लेखात आपण योग्य आहाराविषयीच बोलणार आहोत.

तुम्हाला माहितीच असेल काही पोषक घटक एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. जसे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी इ. मात्र, अशा काही गोष्टी आहेत ज्या एकत्र खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तुमची पचनक्रिया तसेच आरोग्य बिघडू शकते. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र खाणे टाळले पाहिजे, चला जाणून घेऊया-

आपण सर्वजण जाणतो दही दुधासोबत खाणे चुकीचे आहे. यासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण एकत्र खाणे टाळले पाहिजे. या गोष्टी एकत्र खाल्ल्यानंतर पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्या त्या गोष्टी जाणून घेऊया-

या गोष्टी एकत्र खाणे टाळा :-

पराठे आणि दही

सध्या आपल्या देशात पराठ्यासोबत दही खाणे खूप सामान्य आहे. पराठ्यासोबत दही अनेकांचा आवडता नाश्ता आहे. सकाळी बरेच जण याचे सेवन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, याचे एकत्र सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. होय, पराठ्यामध्ये चरबी असते आणि दही चरबीच्या पचनात अडथळा निर्माण करते. तुम्ही दही आणि रोटी यांचे सेवन करू शकता. पण पराठा आणि दही यांचे एकत्र सेवन तुमचे आरोग्य बिघडवू शकते.

जेवण आणि चहा

आपण सगळेच जाणतो, भारतात मोठ्या प्रमाणात जेवण जेवल्यानंतर चहा पिण्याची सवयी असते, अन्न खाल्ल्यानंतर पचनशक्ती वाढते असे अनेकदा ऐकायला मिळाले आहे. पण हे उलट आहे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये, त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते. आणि तुम्हाला पोटदुखी सारख्या समस्यांना समोर जावे लागू शकते.

मासे आणि दही

खरंतर, मांसाहारी पदार्थ खाल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो, माशासोबत कधीही दहीचे सेवन करू नये. कारण दही थंड असते तर मासे गरम, हे दोन्ही पदार्थ एकमेकांच्या उलट आहेत, हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटाचा त्रास आणि त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. म्हणूनच याचे एकत्र सेवन टाळले पाहिजे.

दूध आणि तळलेले पदार्थ

कधीही दुधासोबत तळलेले पदार्थ खाणे टाळावे. दुधात असलेले प्रथिने तळलेल्या पदार्थांवर प्रतिक्रिया देऊ शकतात आणि आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. याशिवाय उडीद डाळ आणि तीळ घालूनही दूध पिऊ नये. यामुळे अयोग्यावर उलट परिणाम होतो, आणि तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

दूध आणि फळे

आपण अनेकदा ऐकले असेल दुधासोबत फळे कधीही खाऊ नयेत. जेव्हा तुम्ही फळे दुधासोबत खातात, तेव्हा दुधात असलेले कॅल्शियम फळांमधील एन्झाईम्स शोषून घेते आणि तुमच्या शरीराला फळांमधून पोषण मिळत नाही. म्हणूच याचे एकत्र सेवन टाळले पाहिजे.

फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स

आपण नेहमीच फास्ट फूडसोबत कोल्ड ड्रिंक घेणे पसंत करतो. पण तुमच्या माहितीसाठी, हे करणे हानीकारक ठरू शकते. कधीही पिझ्झा, बर्गर, छोले भटुरे यांच्यासोबत थंड पेय घेऊ नये. तळलेले अन्न आम्लयुक्त असते आणि शीतपेये देखील आम्लयुक्त असतात. एक गरम आणि दुसरा थंड. दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू शकते.