चक्क पक्ष्यासारखा हवेत उडणारा मासा ! पहा व्हिडिओ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flying Fish : निसर्गाची किमया अनेकदा आपल्याला थक्क करून सोडते. आता मासे म्हटले की ते पाण्यात राहतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. माशांच्या काही प्रजाती अशाही आहेत की ज्या पाण्यात पोहताना हवेत उसळी घेतात आणि काही फुटांवरपुन्हा पाण्यात सूर मारतात.

पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडीओमध्ये एक मासा चक्क समुद्राच्या पाण्यावरून लांबपर्यंत उडताना दिसत आहे. वास्तविक मासे जरी हवेत उसळी घेत असले तरी त्यांच्या पंखांची रचना अशी नसते की ते पक्ष्यांसारखे हवेत उडू शकतील.

पण हा जो व्हिडीओमध्ये दिसत आहे, तो मासा वेगळाच आहे. आपले पंख म्हणजेच पाण्यात पोहण्यासाठी उपयोगी येणारे पर पसरून हा मासा हवेत एखाद्या ग्लायडरसारखा तरंगत लांबपर्यंत जातो.

 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे की, तो आतापर्यंत २० लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला २३ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मात्र पक्ष्यासारखा हवेत उडणारा हा मासा नेमका कोणता आहे याबाबत काहीही माहिती या व्हिडीओसोबत देण्यात आलेली नाही.

एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘बुटेनगीबिडेन’ नावाच्या हँडलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत ८०० वेळा हा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ