Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान काय काय करू शकते याचे वेगवेगळे किस्से सध्या समोर येऊ लागले आहेत. एआय आता संपूर्ण विश्वच व्यापून टाकणार, असे स्पष्ट होऊ लागले आहे. याचे ताजे उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. येथील एका चार वर्षांच्या मुलाला केवळ एआयमुळेच जीवनदान लाभले आहे.
येथील कर्टनी नावाच्या एका महिलेच्या ४ वर्षांच्या मुलगा अॅलेक्स याला विचित्र आजार जडला होता. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो समोर दिसेल ती वस्तू चावण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची उंची वाढण्याची प्रक्रियादेखील थांबली होती. त्याच्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूमधील संतुलनही बिघडले होते.
अशा विचित्र अवस्थेत हा मुलगा तीन वर्षे संघर्ष करीत होता. या कालावधीत त्याच्या आई वडिलांनी त्याला वेगवेगळ्या १७ डॉक्टरांना दाखवले होते. पण एकाही डॉक्टरला त्याच्या आजाराचे निदान करता
अखेर आईवडिलांनी चॅट जीपीटी या एआय टूलची मदत घेण्याचा निर्णय घेतला. चॅट जीपीटीने ॲलेक्सचा संपूर्ण मेडिकल डेटा तपासून असे निदान केले की, ॲलेक्सला ‘टेथर्ड कॉर्ड’ या न्यूरॉलॉजिकल सिंड्रोमची समस्या आहे.
चॅट जीपीटीने केलेले हे निदान ॲलेक्सच्या पालकांनी एका न्यूरोसर्जनसमोर ठेवले. चॅट जीपीटीने केलेले निदान अचूक आहे, असे न्यूरोसर्जनने सांगितले आणि त्यानंतर अॅलॅक्सच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे ॲलेक्सच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. एक प्रकारे ॲलेक्सला चॅट जीपीटीनेच जीवनदान दिले आहे.