लाईफस्टाईल

Green Cardamom Benefits : छोटीशी वेलची आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, वाचा…

Published by
Renuka Pawar

Green Cardamom Benefits : छोटीशी वेलची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेलची जेवणाची चव वाढवण्यासोबत आरोग्यालाही खूप फायदे देते. तसे आपण वेलची नुसती गोड पदर्थात टाकत नाही तर सर्व परदार्थांमध्ये टाकतो.

वेलचीचा प्रभाव हा थंड असतो. वेलची खाल्ल्याने शरीर थंड राहते. याच्या कूलिंग इफेक्टमुळे तुम्ही ती उन्हाळ्यात सहज खाऊ शकता. लोक अनेकदा हिरवी वेलची चहा, दूध इत्यादींमध्ये घालून सेवन करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिरवी वेलची पावडरही सेवन करू शकता. आजच्या या लेखात आपण वेलचीचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग…

वेलची खाण्याचे फायदे :-

-ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी वेलची खूप फायदेशीर मानली जाते. वेलचीच्या सेवनाने पोटात आणि छातीतील जळजळ कमी होते. जर तुम्हालाही पोटात उष्णता जाणवत असेल तर तुम्ही हिरव्या वेलची पावडरचे सेवन करू शकता. हिरवी वेलची पोटात थंडावा राखते. जर तुम्हाला सतत पित्त होत असेल तर हिरव्या वेलचीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

-बऱ्याचदा आपली पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे आपल्याला पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही हिरव्या वेलची पावडरचे सेवन करू शकता. हिरवी वेलची बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त आणि अपचन इत्यादी पचनाच्या समस्यांपासून आराम देते. यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि समस्यांपासून आराम मिळतो.

-अनेकदा त्वचेशी संबंधित समस्याही आपल्याला सतावतात असतात. वातावरण बदलेले की त्वचेवर पुरळ, डाग आणि फोड येतात. अशा परिस्थितीत हिरव्या वेलचीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. हिरवी वेलची शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे त्वचा सुधारते आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

-बऱ्याचदा उष्णतेमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही हिरव्या वेलची पावडरचे सेवन करू शकता. हिरवी वेलची शरीराला ऊर्जावान बनवते. यामुळे चांगली झोप येते आणि थकवा आणि चिंताही दूर होते.

Renuka Pawar