Chandra Gochar : ज्योतिषशास्त्रात चंद्राला विशेष महत्त्व आहे. चंद्र माता, मन, मनोबल, मेंदू इत्यादींचा कारक मानला जातो. चंद्र देव दर अडीच दिवसांनी राशी बदलत असतात. अशातच 24 मार्चला होलिका दहनाच्या दिवशी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव पडेल. पण काही राशी अशा आहेत ज्यावर चंद्र देवाचा विशेष आशीर्वाद असेल, कोणत्या त्या राशी पाहूया…
कन्या
कन्या राशीच्या लोकांना या काळात संपत्ती मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदान ठरेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत फायदा होईल.
कर्क
तूळ राशीतील चंद्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात उत्पन्न वाढेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपतील. वाहन खरेदीची शक्यता आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. नातेवाईक आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
धनु
तूळ राशीतील चंद्राचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी यशाचे दरवाजे उघडेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. मन शांत राहील. तणावातून आराम मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला मूल असेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील.