लाईफस्टाईल

स्त्रीची भीती अशीही ! कुठल्याही स्त्रीच्या संपर्कात येऊ नये यासाठी त्याने ५५ वर्षे घरात कोंडून घेतले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : यादवी युद्धाने जराजर्जर झालेल्या रवांडात सध्या क्लिचा इन्झामचा या बाबाची भलतीच चर्चा सुरू आहे. स्त्रीसंग टाळण्यासाठी क्लचा याने स्वतः ५५ वर्षे घरात कोंडून घेतले. महत्त्वाचे म्हणजे ही ५५ वर्षे तो महिलांच्या मेहेरबानीमुळेच जगू शकला.

क्लचा इन्झामचा १६ वर्षांचा असताना यादवीने एकांडा पडला. त्याला स्वतःचे असे कुणीच उरले नाही. याच दरम्यान, त्याच्या मनात स्त्रीबद्दल भीती निर्माण झाली ती कायमचीच. या भीतीने त्याचे संपूर्ण आयुष्य गिळले. भीती कधी आजारात बदलली याचे त्यालाही समजले नाही.

क्लचा इन्झाम आता ७१ वर्षांचा जख्खड म्हातारा आहे. ५५ वर्षांपूर्वी त्याने स्वतःला घरात कोंडून घेतले. घर आणि घराचे अंगण हेच त्याचे आयुष्य. घराभोवती त्याने १५-१६ वर्षांचा असताना तारेचे कुंपण टाकले. तेही १५ फूट उंचीचे.

कारण, कुठल्याही स्त्रीला ते ओलांडता येऊ नये. या स्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना खूपच कष्ट पडले. अखेर तो बाहेर आला तेव्हा ५५ वर्षे उलटली होती. बाहेर आल्यावर त्याने मनातली भीती बोलून दाखवली.

कुठल्याही स्त्रीच्या संपर्कात येऊ नये यासाठी घराला कुंपण घातले. स्त्रीला मी खूपच घाबरतो, असे तो सांगत होता. ग्रामस्थ त्याच्या बतावणीवर हसत होते. परंतु हा गायनोफोबिया नावाचा आजार असल्याचे त्यांच्या गावीही नाही.

या आजारात अकारण मनात महिलांविषयी भीती निर्माण होते. भीतीचे स्वरूप इतके भयानक असते की, स्त्रीचा नुसता विचारही अशा रुग्णांसाठी धोकादायक ठरतो. आता क्लचा याच्या मनात ही भीती का बसली याचे निश्चित कारण त्याला सांगता आलेले नाही.

त्यामागे पौगांडावस्थेतल्या घटना कारणीभूत ठरल्या असाव्यात, असा अंदाज बांधता येतो. त्याच्या शेजारी राहाणाऱ्या महिलांनीच खरे तर त्याला जगवले. त्याला रोजचे जेवण याच महिला द्यायच्या.

या महिला सांगतात, क्लचा अभावानेच व्हरांड्यात दिसला असावा. स्त्रियांशी बोलला तरी तो खूप लांबून. जेवणही त्याला खूप लांबूनच द्यायला लागायचे. शेजारपाजारच्या महिलांमुळे क्लचा इन्झाम जगला.

Ahmednagarlive24 Office