Shani Vakri 2024 : वैदिक ज्योतिषात शनि देवाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शनिदेव हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्षे लागतात. शनि हा कर्मानुसार फळ देणारा देवता मानला जातो.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान असते तो धनवान आणि धार्मिक विचारांचा असतो. पण ज्या राशीत शनी कमकुवत आहे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
सध्या शनिदेव स्वतःच्या राशी कुंभ राशीत विराजमान आहे आणि २०२५ पर्यंत याच राशीत राहणार आहे. पण 30 जून रोजी शनि कुंभ राशीत उलटी चाल चालेल, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण अशा काही राशी आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
धनु
धनु राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा होणार आहे. या काळात व्यवसायात लाभ होईल. तुम्हाला भौतिक सुख आणि संपत्ती मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. नोकरीचा शोध पूर्ण होईल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी देखील शुभ राहील. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात समृद्धी येईल. करिअर आणि व्यवसायातही फायदा होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील.
कर्क
शनीची ही चाल कर्क राशीच्या लोकांना खूप फायदेशीर ठरेल, या त्यांना अचानक पैसे मिळू शकतात. करिअर आणि बिझनेस संदर्भात चांगली बातमी देखील मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यशाची शक्यता असेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. मात्र, व्यापाऱ्यांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे.