एअरटेलने आणला हा नवीन प्लॅन; जाणून घ्या डिटेल्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-लॉक डाउनच्या काळामध्ये जास्त प्रमाणात होणारा इंटरनेट डाटाचा वापर लक्षात घेता टेलीकॉम कंपन्या जास्तीत जास्त फायदा ग्राहकांना देत आकर्षित करत आहेत.

आता एअरटेल या टेलीकॉम कंपनीने २५१ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 50GB 4G डेटा मिळेल. विशेष म्हणजे, २५१ च्या या प्लॅनची कोणतीही व्हॅलिडिटी नाही. या प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त डेटाचा लाभ मिळेल.

जर तुमचा नियमीत डेटा पॅक संपल्यानंतर तुम्हाला हा पॅक उपयोगी पडेल. एअरटेलच्या 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 1GB डेटा मिळतो.

या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि 100 SMS चाही लाभ मिळेल. 18 दिवस या प्लॅनची वैधता असेल. एअरटेलचा हा प्लॅन बिहार, झारखंड, कोलकाता, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कल्समध्ये उपलब्ध आहे.

याशिवाय हा प्लॅन ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग) आणि पश्चिम बंगालमध्येही उपलब्ध आहे. एअरटेलचा दुसरा प्लॅन 129 रुपयांचा आहे.

या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा 99 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत. पण याची व्हॅलिडिटी 24 दिवस असून यात एकूण 300 SMS पाठवता येतात. 129 रुपयांचा हा प्लॅन आसाम, बिहार, झारखंड, गुजरात, हरयाणा,

केरळ, कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, नॉर्थ ईस्ट, ओडीशा, राजस्थान, उत्तर प्रदेश (काही भाग) , उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये उपलब्ध आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24