लॉकडाऊनमध्ये ग्राहकांसाठी एअरटेलचे ‘हे’ खास अॅप;

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-लॉकडाऊनमुळे सर्वच लोक घरात अडकले आहेत. या काळात मोबाईलचा वाढता वापर पाहता टेलिकॉम कंपन्या अनेक स्कीम आणत आहेत. आता एअरटेलने मोबाईल रिचार्ज करणे अगदी सोपे केले आहे.

त्यासाठी खास ‘एअरटेलच्या थँक्स’ हे अॅप लॉन्च केले आहे. एअरटेलच्या थँक्स अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करणे अधिक सोपे झाले आहे.

फक्त रिचार्जच नाही तर या अॅपवर टी. व्ही., विंक म्युझिक, यूपीआय पेमेंट आणि अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप या सारख्या सेवा देखील उपलब्ध आहेत. तसेच एअरटेलच्या www.airtel.in/airtel-thanks-app या वेबसाईटवर थँक्स अॅपविषयी अधिक माहिती मिळेल

या चार सोप्या पद्धतीने करा रिचार्ज

१) प्ले स्टोअर वरुन थँक्स अॅप डाऊनलोड करा.

२) त्यानंतर रिचार्जचा पर्याय निवडा.

३) मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिचार्जची रक्कम टाका.

४) ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडल्यानंतर काही क्षणात रिचार्ज होईल

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24