Avoid These Mistakes While Eating Fruits : फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फळांमध्ये आढळणारे पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात, म्हणून डॉक्टर देखील आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तसे बरेच जण जेवल्यानंतर फळे खाणे पसंत करतात, तर काही जण रिकाम्या पोटी फळे खाणे पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? फळे खाण्याची एक योग्य वेळ आणि योग्य पद्धत असते, त्यानुसार आपण फळांचे सेवन केल्यास आपल्याला जास्त फायदे मिळतात.
बऱ्याच वेळा फळे खाण्याची योग्य वेळ आपण ठरवत नाही, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हाच आपण फळे खातो. पण तुम्हाला माहिती आहे का? फळे खाताना तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. म्हणूनच जेव्हा आपण फळे खातो तेव्हा ते योग्य पद्धतीने खाणे आपल्यासाठी फायद्याचे ठरते, तुम्हीही फळे खाताना अशा चुका करत असाल तर पुढच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा. आज आपण फळे खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत.
फळे खाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
-फळे खाताना त्याचा कोणत्याही गोष्टींमध्ये समावेश करू नका, उदारणार्थ फळे, दूध, दही इ. पदार्थांसोबत खाणे टाळा, कारण इतर गोष्टींपेक्षा फळे लवकर पचतात. म्हणूनच शक्यतो फळे कोणत्या गोष्टींसोबत खाऊ नका.
-फळे काही पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्यास ते शरीरात विषारी पदार्थ तयार करतात आणि शरीराला हानी पोहोचवतात. म्हणून नेहमी स्वतंत्र फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हीही अशा चुका करत असाल तर आजपासूनच या गोष्टी टाळा.
-कधीही गोड आणि रसाळ फळे आंबट गोष्टींमध्ये मिक्स करून खाऊ नका. त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, किंवा तुमची पचनक्रिया बिघडू शकते, आणि तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
रात्री फळे खाणे टाळा
-फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळे खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक गोडवा मिळतो, त्यामुळे झोपेत अडथळे येऊ शकतात. म्हणूनच रात्री फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्री झोप न झाल्याने तुमचा पुढचा संपूर्ण दिवस खराब जातो, म्हणूनच रात्री शक्यतो फळे खाणे टाळा.
-कधीही फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील पीएच पातळी असंतुलित होऊ शकते आणि त्यामुळे डायरिया किंवा कॉलरा होऊ शकतो.
-आपण सफरचंद, किवी आणि चिकू खाताना त्यांच्या साली फेकून देतो, पण यांसारख्या फळांच्या सालींमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि ए जास्त प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.