अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-सध्या लॉक डाऊनमध्ये सर्वच लोक घरी आहेत. जेव्हा विविध विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा वाद होणे साहजिकच आहे.
भरपूर कालावधीसाठी एकाच ठिकाणी बंदिस्त झाल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या बळावतात. विशेषत: कपल्ससाठी हे खूप आव्हानात्मक ठरू शकतं.
त्यामुळे आपापसात वाद होत असतील तर एकमेकांना समजून घेत प्रेमाने वागा व काही टिप्स फॉलो करा .
१) परिस्थिती समजावून घ्या
लॉकडाऊनमध्ये जशी तुमची चिडचिड होते आहे, तुम्ही ज्या मानसिकतेमध्ये आहेत त्याचपद्धतीने जोडीदाराचीही मानसिकता झालेली आहे हे समजून घ्या. डोकं शांत ठेऊन शांतमनाने एकमेकांशी बोलत राहा. तुम्ही एकमेकांची काळजी घेऊ शकता. राग धरून एकाच ठिकाणी राहणं योग्य नाही.
२) जबाबदारी समजून वागा
तुम्ही बाहेरील लोकांच्या संपर्कात कमी आहात. अशावेळी राग आला, चिडचिड झाली तर त्यासाठी जोडीदाराला जबाबदार धरू नका किंवा त्याच्यावर राग काढू नका. असं का होत आहे, याचा शांतपणे विचार करा. थोडा वेळ घ्या आणि त्यातून मार्ग काढा.
३) रोमँटिक जगण्यासाठीची नियोजन
आतापर्यंत बिझी शेड्युलमुळे तुम्हाला वेळ मिळाला नव्हता. आता रोमँटिक क्षण जगण्यासाठी घरातल्या घरातच एक नाइट डेट ठरवा. आपल्या जुन्या चांगल्या आठवणी आठवा. दोघंही एकमेकांसह छान वेळ घालवा.
४) एकमेकांच्या आवडीनिवडी जपा.
एकमेकांच्या आवडीनिवडी जपा. एकत्र चित्रपट पाहा, गेम खेळा.
या टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमचे प्रेम बहरुन येऊन वाद कमी होतील.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com