लाईफस्टाईल

Astro Tips: सावधान! चुकूनही ‘या’ 5 गोष्टी कोणालाही उधार देऊ नका नाहीतर होणार ..

Published by
Ahmednagarlive24 Office

Astro Tips:  मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून घेण्याची परंपरा आहे. यामुळे कोणताही विचार न करता आपण आपल्या वस्तू इतरांना देतात किंवा इतरांकडून घेतात.

मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? वास्तुशास्त्रानुसार एखाद्याकडून काही गोष्टी उधार घेणे हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या आरोग्यावर तसेच आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर वाईट परिणाम होऊ शकते.

त्यामुळे आज या लेखात आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी कधीही इतरांना देऊ नये याबद्दल माहिती देणार आहोत. चला मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.  तुम्ही खूप ऐकलं असेल की मध, मीठ, साखर यांसारख्या गोष्टी कोणालाही देऊ नयेत. याशिवाय अशा अनेक वैयक्तिक गोष्टी आहेत ज्या कोणाशीही शेअर करू नयेत.

कोणालाही कपडे उधार देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येकाचे नशीब आणि शरीराची उर्जा वेगवेगळी असल्याने एखाद्याने वापरलेले कपडे उधार देऊ किंवा घेऊ नये. अशा परिस्थितीत व्यक्तीला शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घड्याळ कोणालाही उधार देऊ नका

तुमचे घड्याळ कोणालाही उधार देऊ नका. असे मानले जाते की एखाद्याचे घड्याळ घेतल्याने त्यांची वाईट वेळ तुमच्यापर्यंत येऊ शकते. म्हणूनच वेळेशी संबंधित गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत. यामुळे तुमच्यावर दुर्दैव येऊ शकते.

कोणालाही रुमाल उधार देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार रुमालही उधार देऊ नये. जर तुम्ही एखाद्याचा रुमाल वापरत असाल तर ते वादाचे कारण बनू शकते, कारण ते व्यक्तीच्या उर्जेशी देखील संबंधित आहे.

कोणालाही पेन देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने आपली लेखणी कोणालाही उधार देऊ नये आणि कोणाकडूनही उसने घेऊ नये. एखाद्याचे पेन घेणे किंवा देणे हे आर्थिक अस्थिरता निर्माण करते असे मानले जाते.

कोणाला झाडू देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की झाडूमध्ये देवी लक्ष्मी निवास करते. अशा परिस्थितीत दुसऱ्याचा झाडू अजिबात वापरू नये. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

हे पण वाचा :-  Central Employees Salary Hike : मोठी बातमी ! आता पगारात होणार 9000 रुपयांची वाढ; सरकार करणार घोषणा, जाणून घ्या ताजे अपडेट्स

Ahmednagarlive24 Office