Astro Tips : आपण भारतातील बहुतेक घरांमध्ये मनी प्लांट पहिले असेल. घरामध्ये मनी प्लांट लावण्यामागे प्रत्येकाचे वेगळे कारण असते, तर काहीजण दुसऱ्यांना पाहून ते घरात लावतात, पण मनी प्लांटशी संबंधित काही नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. ज्यानुसार तुम्ही ते घरात आणले पाहिजे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम जाणवतात. वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना खूप महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर मनी प्लांट देखील खूप महत्वाचा मानला जातो.
घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासोबतच ही एक अशी वनस्पती मानली जाते जी लोकांना समृद्ध बनवते. पण काही नियम पाळले तरच, नाहीतर आर्थिक संकटाना समोरे जावे लागू शकते, आणि तुम्ही पैशापासून वंचित राहता. होय, आज आम्ही तुम्हाला मनी प्लांट लावताना कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या प्रकारचे मनी प्लांट आपल्याला गरीब बनवतात हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया….
मनी प्लांट लावताना करू नका ‘या’ चुका
-ज्योतिष शास्त्रानुसार चोरीचा मनी प्लांट कधीही घरात लावू नये. असे केल्याने आर्थिक संकट तर येतेच पण लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावा तेव्हा नेहमी बाजारातून खरेदी करून लावा.
-आर्थिक संकट टाळण्यासाठी मनी प्लांट नेहमी योग्य दिशेने लावावा अन्यथा तुम्ही लवकरच गरीब होत जाता. घराच्या ईशान्य दिशेला मनी प्लांट चुकूनही ठेवू नये असे म्हणतात. या चुकीमुळे व्यक्ती कर्जात बुडू शकते, मनी प्लांट नेहमी घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावा. असे केल्याने घरात सकारात्मकता राहते आणि व्यक्तीला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत नाही.
-ज्योतिष शास्त्रानुसार मनी प्लांट खूप वेगाने वाढतो. त्यामुळे ते कधीही थेट जमिनीवर लावू नये. मनी प्लांट कुंडीत लावल्यानंतर ते दोरीच्या साहाय्याने वरच्या दिशेने सरकवावे. असे केल्याने प्रगतीबरोबरच घरात शांतीही राहते. खाली पडलेल्या मनी प्लांटमुळे लोकांना खूप त्रास होऊ शकतो.