Astro Tips : आपल्या जीवनाशी निगडित सर्व आनंद मिळविण्यासाठी आपल्याला दैवी लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्वाचा मानला जातो. सध्या हेच कारण आहे की प्रत्येक जण धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहे.
परंतु अनेकवेळा आपल्याकडून कळत किंवा नकळतपणे काही चुका होत असतात, ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घराशी निगडित वास्तूदोषच कोणत्याही घरातून धनदेवतेच्या निघून जाण्याचे कारण असते असे नाही. इतर अनेक कारणे असतात.
महिलांचा अपमान करू नये
ज्योतिष शास्त्रानुसार, महिलांचा अपमान करणे टाळावा. मग ती त्यांच्या घरातील महिला असो किंवा इतर घरातील महिला असो. कारण त्यांच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानण्यात येते. ज्या घरामध्ये महिलांचा अनादर होतो, त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कधीच नसतो. तसेच घरातील मोठ्यांचाही अनादर करू नका.
भगवान विष्णूचीही करा पूजा
ज्योतिष शास्त्रानुसार, घरातील देवी लक्ष्मीच्या पूजेसोबत भगवान विष्णूची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच त्यांना लक्ष्मी-नारायण म्हटले आहे. मान्यतेनुसार, केवळ देवी लक्ष्मीची पूजा केली तर तिचा आशीर्वाद मिळत नाही. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूची देखील पूजा करावी.
चुलीवर उष्टी भांडी कधीही ठेवू
ज्योतिष शास्त्रानुसार चुलीवर उष्टी भांडी ठेवू नयेत. चूल नेहमी स्वच्छ ठेवावी. असे केले तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. शास्त्र आणि पुराणामध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्या घरामध्ये चुलीवर उष्टी भांडी ठेवली जातात, त्या ठिकाणी गरीबी वास करते. तसेच अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच राहत नाही. खरंतर मंदिरानंतर स्वयंपाकघर हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते.
चंदन एकत्र चोळू नये
चंदन कधीही एका हाताने चोळू नये. असे केले तर तुम्ही गरीब होऊ शकता. तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल. तसेच चंदन चोळल्यानंतर थेट देवाला लावू नका. कारण ते शुभ आणि फलदायी नसते. अशावेळी चंदन बारीक करून सर्वात अगोदर एका भांड्यात ठेवा आणि त्यानंतर देवदेवतांना लावा.
उत्तर दिशेला टाकू नये कचरा
वास्तु शास्त्रानुसार उत्तर दिशेची देवता कुबेर आहे. त्यांना शास्त्रामध्ये धनाची देवता म्हणतात. अशावेळी घराच्या उत्तर दिशेला कचरा किंवा डस्टबिन कधीही ठेवू नका. ही दिशा सतत स्वच्छ ठेवावी. असे केले तर धनप्राप्ती होते . ज्या घरात लोक उत्तर दिशेला कचरा गोळा करतात त्या घरात लक्ष्मी कधीच येत नाही. तसेच कुबेर देवताही संतप्त होतात.