लाईफस्टाईल

बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याजवळ आहेत ‘या’ आलिशान एसयूव्ही, ताफ्यात धावतात ‘या’ खास कार

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : बाबा बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ओळखत नाही असा कुणी सापडणार नाही. लोक त्यांना परचेवाला बाबा म्हणूनही ओळखतात. अनेकांच्या चर्चेमध्ये ते नेहमीचीच असतात.

धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विविध वक्तव्यांनी व त्यांच्या चिठ्ठीद्वारे मनातील ओळखण्याच्या त्यांच्या व्हिडिओद्वारे ते लोकप्रिय झाले. अनेक लोक त्यांना कट्टर हिंदू मानतात, त्यांचे सर्व आहि सत्य आहे असे मनात. तर काही लोक त्यांच्यावर टीकाही करतात. आज आपण याठिकाणी शास्त्रींच्या कार कलेक्शनबद्दल माहिती पाहुयात.

बाबांच्या काफिल्यात असणारी वाहने पाहून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. बाबा धीरेंद्र शास्त्री यांना रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू, लँड क्रूझर यांसारख्या आलिशान कारमध्ये अनेकदा पाहिले गेले आहे. अनेक महागड्या गाड्याही त्यांच्या ताफ्यात दिसल्या आहेत. यात जी-वॅगन, ऑडी, पोर्श सारख्या गाड्यांचा समावेश आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्या बाबांच्या स्वतःकडे आहेत.

Toyota Fortuner

26 वर्षीय बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर कार आहे. या फॉर्च्युनरमध्येच शक्यतो त्यांना जास्त वेळा पहिले गेले आहे.

Toyota Innova Crysta

त्यांच्या ताफ्यात इतर अनेक वाहने आहेत जी त्यांच्या ताफ्याच्या सौंदर्यात भर घालतात. यामध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या एसयूव्हीमध्येही बाबा नेकदा दिसले आहेत.

Tata Safari

शास्त्रींना जवळपास जायचे असेल तर टाटा सफारीचा ते वापर करतात. ही एसयूव्ही बाबांच्या घराबाहेर उभी असते. बाबा जेव्हा कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांच्या ताफ्यात 20 ते 40 वाहने असतात. बाबांकडे स्वत:ची फक्त 3 ते 4 वाहने आहेत. पण ज्यांची बाबांवर श्रद्धा आहे ते देखील बाबांच्या ताफ्यात सामील असतात. बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री जर देशाबाहेर गेले तर तिथले लोक त्यांच्यासाठी आलिशान लग्जरी कार बुक करतात.

Ahmednagarlive24 Office