फास्ट फूडचे अनेक जण शौकीन आहेत. फास्ट फूड हे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यातून ते जर शिळे झाले असेल मुळीच खाऊ नका, असा सल्ला डॉक्टर देतात. पास्ता हा असाच एक फास्ट फूडचा लोकप्रिय प्रकार आहे.
पण सध्या तो एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. या पास्तामुळे एका तरुणाने जीव गमावल्याची ही दुर्दैवी घटना आहे. खरेतर ही घटना बेल्जियममधील असून ती २००८ मधील आहे. पण काही कारणाने या घटनेची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्टस्नुसार, एजे असे या २० वर्षीय तरुणाचे नाव होते. एकेदिवशी रात्रीच्या डीनरमध्ये त्याने घरातल्या फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा पास्ता खाल्ला. पास्ता सुमारे चार-पाच दिवसांपूर्वी बनवलेला होता.
पास्ता खाल्ल्यानंतर काही वेळाने त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. काही वेळातच त्याची प्रकृती ढासळू लागली. झोपेतच फूड पॉयझनिंग होऊन त्याचा मृत्यू झाला होता.
अर्ध्या तासानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्याला पोटदुखी, डोकेदुखी तसेच जुलाब, उलट्या होऊ लागल्या. वारंवार उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे तो ग्लानी येऊन बिछान्यावर पडला. त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला होता.
तथापि ही घटना २००८ सालमधील असताना आता त्याची चर्चा कशी काही पुन्हा सुरू झाली हे एक कोडेच आहे. ही बातमी जवळपास सर्वच परदेशी संकेतस्थळांवर पुन्हा प्रसिद्ध झाली असून, चर्चेत आहे.