सावधान! कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक फेसशिल्ड वापरताय ? तज्ञ म्हणतात….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबरोबरच अनेक लोक प्लास्टिक फेसशिल्डचाही वापर करीत असतात.

मात्र, असे फेसशिल्ड कोरोनाला थांबवू शकत नसल्याचे दिसून आले आहे. जपानी सुपरकॉम्प्युटर ‘फुगाकू’ने हे सिद्ध करून दाखवले. त्यामुळे फेसशिल्ड हे मास्कला पर्याय बनू शकत नाही असे संशोधकांनी म्हटले आहे.

या कॉम्प्युटरनुसार प्लास्टिक फेसशिल्ड हे एअरोसोल्सना पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेले नाही. हे फेसशिल्ड कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाही.

जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरपैकी एक असलेल्या ‘फुगाकू’ने अशा फेसशिल्डचे सिमुलेशन केले आहे. त्यामध्ये शंभर टक्के एअरबॉर्न ड्रॉपलेटस् पाच मायक्रोमीटरहून लहान असल्याचे आढळले.

ते प्लास्टिक विझार्डस्मधूनही वाचू शकतात. त्यामुळे पारदर्शक फेस शिल्डमधून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकत नाही असे सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24