अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-शरीरासाठी दूध फायदेशीर असते. दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. परंतु जर तुम्हाला कुणी दुधापेक्षा बिअर चांगली असे म्हटले तर? आश्चर्य वाटले ना? परंतु असा दावा PETA (पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ ऍनिमल्स) या संस्थेने केला आहे.
‘हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, पेटा या संस्थेने दूध पिण्यापेक्षा बिअर पिणे आरोग्यदायी असल्याचे सांगितले आहे.
बिअर पिल्याने केवळ हाडेच मजबूत होत नाहीत, तर बिअर पिणाऱ्या व्यक्तीचे आयुष्यही वाढते. म्हणूनच दूध न पिण्याचा सल्लाही पेटाने दिला आहे. या दाव्यामागे पेटाने स्पष्टीकरणदेखील दिले आहे.
दूध प्यायल्याने शारीरिक नुकसान होत असल्याचे पेटाने सांगितले आहे. त्यातही गायीचे दूध प्यायल्याने माणूस लठ्ठ होतो. डायबिटीज आणि कॅन्सर असे गंभीर आजार दूध पिल्याने होऊ शकतात असेही पेटाने सांगितले आहे.
पेटाने केलेल्या या दाव्यावर अनेक जणांनी टीका केली आहे. बिअर हे अल्कोहोल आहे. बियर बनवण्यासाठी ज्या वस्तूंचा वापर केला जातो, त्यात पोषक तत्वे असतात.
बिअर बनवण्यासाठी गहू, मका, तांदळाचा वापर केला जातो. हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बिअरमध्ये ९० टक्के पाण्यासह फायबर, कॅल्शियम, आयर्न अशी पोषक तत्वे असतात.
दररोज दूध प्यायल्याने हद्यरोग, लठ्ठपणा, डायबिटीज आणि कॅन्सर असे आजार होत असल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com