लाईफस्टाईल

खुर्चीवर बसण्याआधी ही माहिती वाचा वाढेल तुमचे आयुष्य …

Published by
Ahmednagarlive24 Office

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. घरात किंवा कार्यालयात खुर्चीवर बसल्या बसल्या पाय हलवण्याने दारिद्र्य येते, असा समज आपल्याकडे रूढ आहे. पण लीड्स युनिव्हर्सिटीतील संशोधक मात्र वेगळेच सांगत आहेत.

त्यांच्या मते बसल्याजागी पाय हलविण्यामुळे तुमचे आयुष्य काही वर्षांनी वाढू शकते. हा एक प्रकारचा व्यायामच आहे, ज्याचे अनेक शारीरिक लाभ तुम्हाला होऊ शकतात.

काही लोक कार्यालयामध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या पायांची हालचाल करत राहतात, किंवा खुर्ची डावी-उजवीकडे किंवा मागे-पुढे करीत राहतात. पाश्चिमात्य देशांमध्ये हे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. मात्र नव्या संशोधनातून हा जो काही निष्कर्ष काढण्यात आला आहे तो अंधश्रद्धा आणि एटिकेट्स यांना छेद देणारा आहे.

अशा प्रकारची कृती किंवा हालचालींना ‘फिझिंग’ असे म्हणतात, जो एक प्रकारचा व्यायाम आहे. फिझिंगमुळे माणसाचे शरीर सक्रिय राहते आणि विविध रोगांपासून त्याचे संरक्षण करून आयुष्यमान वाढण्यास मदत होते.

लीड्स विद्यापीठातील पोषणतज्ज्ञ जेनेट केड म्हणतात की, अशा प्रकारचे वर्तन सामान्यतः असभ्य मानले जाते. पण या सोप्या क्रिया आपल्याला वजन नियंत्रित करण्यास, तणावापासून वाचवण्यास आणि दीर्घकाळ जगण्यास मदत करू शकतात.

पाय टॅप करण्यासारखी हलकी क्रिया देखील आपल्याला अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करू शकते. यासंदर्भात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, बसलेल्या स्थितीत हालचाल केल्याने २९ टक्के जास्त कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात.

Ahmednagarlive24 Office