Benefits of Clove Water : हिवाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. अशास्थितीत बरेचजण शॅम्पू किंवा इतर उत्पादन वापरून केसांमधील कोंडा घालवण्याचा प्रयत्न करतात, पण असे केमिकल्स वापरणे तुमच्या केसांसाठी घातक ठरू शकतात, यामुळे तुमचे केस कोरडे होऊ शकतात, तसेच अनेक समस्या उद्भवू शकतात.
अशास्थितीत जर तुमहाला कोणत्याही केमिकलचा वापर न करता केसांमधील कोंडा घालवायचा असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. भारतातील प्रत्येक घरामध्ये मिळणारी लवंग अनेक औषधी गुणधर्मांची समृद्ध आहे, याच्या वापराने तुम्ही केसांमधील कोंड्यापासून लगेच सुटका मिळवू शकता. तुम्ही कोंडयासाठी लवंगाचे पाणी वापरू शकता. आजच्या या लेखात आपण याच्या वापराबद्दलच जाणून घेणार आहोत, चला तर मग…
लवंगाचे पाणी कसे बनवायचे आणि ते कसे लावायचे?
लवंगाचे पाणी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवून त्यात पाणी भरून गरम करायला ठेवावे. काही लवंगा घ्या, त्यांचा चुरा करा आणि उकळत्या पाण्यात घाला. आता पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. हे पाणी तुम्ही स्प्रे बाटलीत भरून ठेवू शकता. जास्त पाणी असल्यास फ्रीजमध्येही ठेवू शकता. हे पाणी केसांवर स्प्रे करा आणि डोक्याला मसाज करून घ्या. हे पाणी केसांमध्ये तीन ते चार तास राहू द्या. यानंतर आपले डोके धुवून घ्या. याच्या वापराने तुम्हाला काही दिवसांतच फायदा जाणवेल.
लवंग पाण्याचे फायदे :-
लवंगाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. या पाण्यात अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. याशिवाय केस चांगले हायड्रेटेड असल्यास ते मजबूत होतात. लवंगात व्हिटॅमिन के आणि युगिलॉन नावाचे घटक असतात. ज्यामुळे follicles उत्तेजित होतात आणि रक्त परिसंचरण सुधारते. यासोबतच लवंगामुळे केसांचे कूप देखील मजबूत होतात. त्यामुळे केसगळती कमी होते.