तीळ खाण्याचे फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवीन वर्षाची सुरवात उत्साहाने आणि आनंदाने आपण करतो. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. सर्वांना प्रेमाने व आपुलकीने हा तिळगूळ देऊन “तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत स्नेह वाढवला जातो. थोडक्‍यात तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्यामागची भावना असते.

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला आणि त्यातील आहाराला शास्त्रीय महत्त्व आहे. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्यातील अनेकांना माहित असेल.

कोलेस्ट्रॉल कमी करतं 

तिळात मोनो- सॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं आणि हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतं. हे हृदय देखील सुरक्षित ठेवतं. तिळात सेसमीन नावाचं अ‍ॅन्टिऑक्सिडेंट असतं आणि हे तत्त्व शरीरात कॅन्सर पेशी वाढण्यास प्रतिबंधित करते.

ओमेगा थ्री आणि व्हिटामिन्सनी भरलेलं तीळ हे डिप्रेशनवर लढण्यास मदत करते. तीळ मेंदूला सक्रिय करतो. कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, जिंक आणि सेलेनियम सारख्या घटकांनी परिपूर्ण असलेलं तीळ हाडं मजबूत करतं आणि स्नायू आणि हृदय निरोगी करतं. 

हवामान अनुकूल तीळ

तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अ‍ॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24