Benefits of Gol Gappe : पाणीपुरी कोणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा पदार्थ आवडीने खातात. पाणीपुरीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. पण बऱ्याच लोकांना असे वाटते की, पाणीपुरी आरोग्यासाठी हानिकारक आहे परंतु असे काहीही नाही. त्यापेक्षा पाणीपुरी खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
तुमच्या माहितीसाठी पाणीपुरीच्या पाण्यात अनेक पोषक तत्वे आढळतात ज्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. आजच्या लेखातून आपण पाणीपुरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
पाणीपुरी खाण्याचे फायदे :-
-पाणीपुरीच्या पाण्यात चिंचेची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. चिंचेमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे पोटाला फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने पचनक्रियाही बरी होते. त्यामुळे चिंच आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.
-काळ्या मिठाचा वापर पाणीपुरी बनवण्यासाठी देखील केला जातो, जो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे पोटदुखीपासून आराम देतात. त्याचबरोबर सूज आणि वेदना यांसारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो.
-जिऱ्यामध्ये भरपूर लोह असते ज्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. पाणीपुरीच्या पाण्यात जिरे पावडर देखील टाकली जाते, ज्यामुळे पाण्याची चव आणखी वाढते. जे शुगरचे रुग्ण आहेत त्यांनी पाणीपुरीचे सेवन करावे. कारण त्यातील पाण्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते.
-पाणीपुरीचे पाणी अधिक मसालेदार बनवण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. जे लोक आपल्या वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत, त्यांनीही पाणीपुरीचे सेवन करावे. त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे.
-तसेच पाणीपुरीच्या सेवनामुळे मूड रिफ्रेशर होण्यासाठीही फायदा होतो.
-पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी शक्यतो आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर करतात. हे मसाले तुम्हाला तोड आले असेल त्यावरीलही रामबाण उपाय आहे.