लाईफस्टाईल

सावधान… हे पाच खतरनाक जीव तुमचे घेऊ शकतात प्राण ! ज्यांच्या संपर्कामुळेही मृत्यू होऊ शकतो…

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : संपूर्ण विश्वामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंचा अधिवास आहे. यामधील काही जीव अतिशय सुंदर आणि मानवी जीवन सुसह्य करण्यास मदत करणारे असतात, तर काही प्राणघातक ठरतात. त्यामुळे ‘जसं दिसतं तसं नसतं’ याचे नेहमी भान राखावे लागते.

आज आपण असे कोणते जीवजंतू खरोखरच मानवीजीवांचे कर्दनकाळ ठरू शकतात, याची माहिती घेणार आहोत. यापैकी काही जीव असे आहेत की ते त्यांच्यामध्ये असलेल्या विषामुळे ज्ञात आहेत. त्यांच्यामध्ये असलेल्या विषाच्या केवळ संपर्कामुळेही मृत्यू अटळ ठरतो.

त्यामुळे चुकूनही कधी अशा विषारी जीवजंतू किंवा कीटक, प्राणी यांच्याजवळ जाण्याचा प्रसंग उद्भवला, तर शक्य होईल तितक्या लवकर यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा ‘कुर्बानी’ निश्चित. चला तर मग असे कोणते खतरनाक जीवजंतू आहेत, त्यांच्याबाबत जाणून घेऊ.

किंग कोब्रा : सापांच्या अनेक विषारी प्रजातीमधील सर्वाधिक जहाल विषारी साप म्हणून किंग कोब्राची जगभरात ओळख आहे. जर याच्या विषाची तीव्रताच सांगायची झाली तर याच्या एका देशामध्ये एक हत्ती आणि सुमारे २० माणसे यांचा जीव घेण्याची ताकद असते. याचे विष एकदा माणसाच्या रक्तात मिसळले की, जीव वाचणे केवळ अशक्यच. भारताशिवाय किंग कोब्रा चीनमधील घनदाट जंगलामध्ये आढळतात.

मार्बल कोन: मार्बल कोन हा गोगलगायीसारखा जीव. याचाही डंख आग्यामोहोळाच्या माशीप्रमाणेच विषारी असतो. ६ इंच एवढा आकार असलेल्या या जीवाचा दंश मानवाच्या दृष्टिपटलावरच गंभीर परिणाम करतो. त्यामुळे कायमचे अंधत्व येते. काही घटनांमध्ये अनेकांना प्राणासही मुकावे लागले.

डेथ स्टॉकर विंचू : फिकट पिवळ्या रंगाचा दिसणारा हा विंचू अतिशय ‘डेंजर’ असतो. दक्षिण आफ्रिकेमधील काही भागांमध्ये या अति जहाल विषारी विंचूचा अधिवास आहे. जर त्याने त्यांच्या नांगीने डंख मारला तर सर्वप्रथम श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि काही वेळाने मृत्यू होतो.

ब्ल्यू रिंग : ब्ल्यू रिंग अर्थात ऑक्टोपस या जलचराचा आकार गोल्फमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉलइतका असतो. साधारणपणे हा जीव ऑस्ट्रेलिया, जपान आणि इंडोनेशिया देशांत आढळतो.

बॉक्स जेलीफिश : अतिशय घातक असलेला जेलीफिश प्रशांत आणि हिंदी महासागरामध्ये आढळतो. याचा एक दशसुद्धा जीवघेणा ठरतो. डंख मारल्यानंतर त्यामधील विष मानवाच्या हृदयावर परिणाम करते. हृदयाची धडधडच थांबते आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. आजअखेर अनेकांना या जेलीफिशच्या डंखामुळे यमसदनी जावे लागले.

 

Ahmednagarlive24 Office