लाईफस्टाईल

HDFC Bank Credit Card वापरणाऱ्यांना मोठा झटका ! 1 डिसेंबर पासून बंद होणार ‘ही’ खास सर्व्हिस

Published by
Ahmednagarlive24 Office

HDFC Bank Regalia Credit Card New Rules : एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड हे त्यावर मिळणाऱ्या अनेक फायद्यांमुळे ग्राहकांमध्ये चर्चेत असते. यावेळी मात्र एचडीएफसी बँकेने कोणतीही ऑफर न देता आपल्या एका फेमस क्रेडिट कार्डचे नियमात बदल करून ग्राहकांना झटका दिला आहे.

रेगलिया क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. एचडीएफसी बँक कार्डधारकांना उपलब्ध कॉम्प्लिमेंटरी लाउंज अॅक्सेस व्हाउचर्सची संख्या वाढवत आहे. नवीन नियमांनुसार, ग्राहकांना दरमहा दोन कॉम्प्लिमेंटरी लाउंज अॅक्सेस व्हाउचर दिले जातील, जे 1 डिसेंबर 2023 पासून लागू होतील.

नवीन सिस्टमनुसार, एचडीएफसी बँक रेगलिया क्रेडिट कार्डधारकांना तिमाहीत कमीतकमी 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करणे आवश्यक असणार आहे. जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर हे तिमाही म्हणून ओळखले जातात. खर्चाचे निकष पूर्ण झाल्यानंतरच आता कार्डधारकांना लाउंज बेनिफिट मिळणार आहे.

* Regalia Credit Card यूजर्सना लाउंज बेनिफिट कसे मिळतात?

Regalia क्रेडिट कार्डधारकांसाठी लाउंज बेनिफिट्स घेण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. खर्चाचे निकष पूर्ण झाल्यानंतर कार्डधारकांना एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरील रेगलिया स्मार्टबाय पेज आणि लाउंज बेनिफिट्स पेजला भेट द्यावी लागेल.

येथे यूजर बेनिफिट्स होण्यासाठी लाउंज अॅक्सेस व्हाउचर जनरेट करू शकतात. एचडीएफसी बँक कार्डधारकांना उपलब्ध कॉम्प्लिमेंटरी लाउंज अॅक्सेस व्हाउचर्सच्या संख्येत बदल करत आहे. यामध्ये युजर्संना दोन फ्री लाउंज एन्ट्री व्हाउचर मिळू शकतात.

* HDFC Bank Credit Card यूजर्स ची संख्या मोठी :

HDFC Bank Credit Card वापरणारे युजर्स जास्त आहेत. त्यामुळे बँकेकडूनही विविध ऑफर्स नेहमीच जारी केल्या जातात. खरेदी करताना बहुतांश लोक HDFC Bank Credit Card वापरताना दिसतात. कारण त्यावर कॅशबॅक किंवा इन्स्टंट डिस्काउंट आदी सुविधा मिळत असतात. ऑनलाईन साईटसवर किंवा इ कॉमर्स साईटवर देखील हे Credit Card वापरल्यास अनेक डिस्काउंट ऑफर दिलेल्या असतात. त्याचा फायदा ग्राहकांना होतो.

Ahmednagarlive24 Office