BS-6 महिंद्रा स्कॉर्पियोचे करा बुकिंग अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बहुप्रतिक्षेनंतर महिंद्राच्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियोच्या बीएस-6 मॉडेलचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले असून अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटद्वारे बुकिंग करता येणार आहे.

या व्यतिरिक्त कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही 500, बोलेरो, केयूव्ही100 एनएक्सटी आणि अल्ट्रास जी 4 च्या बीएस-6 मॉडेल्सची बुकिंग सुरू केली आहे. महिंद्राने नवीन बीएस-6 स्कॉर्पियोची माहिती वेबसाईटवर दिली आहे.

मात्र अद्याप किंमतीचा खुलासा केलेला नाही. नवीन स्कॉर्पियो एस5, एस7, एस9 आणि एस11 व्हेरिएंटमध्ये येईल. यामध्ये ग्राहकांना एक्सेसरीज देखील बुक करण्याची सोय आहे.

यात बॉडी-हगिंग बंपर, फॉग लॅम्प गार्निश सेट, डेकल्स, पार्किंग कव्हर, एलॉय व्हिल्ज, हेडरेस्ट-माउंटेड डीवीडी टचस्क्रीन, स्कफ प्लेट्स आणि कारपेट मॅटसारख्या एक्सेसरीज आहेत.

स्कॉर्पियोच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडेलमध्ये 7-स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेंट्ससोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5-स्पोक 17-इंच एलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्ससोबत साइड रिअर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेंस एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आलेले आहे.

इंटेरियरबद्दल सांगायचे तर यात डार्क फॅब्रिक इंसर्ट्ससोबत प्लश फॉक्स लेदर इंटेरियर मिळेल. ऑडिओ आणि क्रूज कंट्रोल्ससह फॉक्स लेदर फिनिशिंग स्टेयरिंग व्हिल आहेत.

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, एयूएक्स-आयएन, जीपीएस नेव्हिगेशनसोबत यूएसबी कनेक्टिव्हिटी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी वेंट्स सारखे फीचर मिळणार आहेत. ‘

अहमदनगर लाईव्ह 24