अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेने सुसाट प्रवास करत असलेल्या पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या दरवाढीला लगाम बसला आहे.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
जाणून घ्या महानगरांतील दर
आता दिल्लीत 1 लीटर पेट्रोलची किंमत 105.84 रुपये आहे. त्याच वेळी, 1 लीटर डिझेल 94.57 रुपये प्रति लिटर आहे.
आता कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 106.43 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 97.68 रुपये प्रति लिटर आहे.
आता मुंबईत 1 लीटर पेट्रोलची किंमत 111.77 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 102.52 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.
आता चेन्नईमध्ये 1 लीटर पेट्रोलची किंमत 103.01 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लीटर डिझेल 98.52 रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे.
कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
असे ठरवतात किंमत –
परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.