Dhanteres 2023 : धनतेरसच्या दिवशी अनेकदा सोन्याची खरेदी केली जाते. यादिवशी सोन्याची केलेली खरेदी ही शुभ मानली जाते. मात्र फक्त सोनेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या या 5 वस्तू खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी नांदते. जाणून घ्या या गोष्टींबाबत.
दरम्यान, या दिवशी सोन्या व्यतिरिक्त तुम्ही चांदीचे लक्ष्मी-गणेश खरेदी करू शकता. हे शक्य नसेल तर लक्ष्मी-गणेशाची मातीची मूर्ती खरेदी करा. दरम्यात या मूर्तीचा आकार हा फक्त हाताच्या अंगठ्याएवढा असावा.
दरम्यान, यापेक्षा मोठी मूर्ती विकत घेऊन घरातील मंदिरात स्थापित केल्यास त्या मूर्तीची रोज योग्य रीतिरिवाजाने पूजा करावी लागेल, अन्यथा मूर्तीमध्ये दोष निर्माण होऊ शकतात. धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत या मूर्तींची पूजा करा आणि नंतर तिजोरीत ठेवा. नियमित उदबत्ती लावावी. यामुळे तुमची संपत्ती वाढेल.
धणे हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवी लक्ष्मीला धने अर्पण केल्यानंतर आपल्या बागेत काही बिया पेरा.
धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरातील लक्ष्मीला म्हणजेच तुमच्या पत्नीला सोन्या-चांदीचे दागिने भेट देण्याव्यतिरिक्त तुम्ही लाल कपडे आणि लग्नाच्या वस्तूही भेट देऊ शकता. हे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.
याव्यतिरिक्त धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने घरात लक्ष्मीची उपस्थिती निश्चित होते. जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर धनत्रयोदशीला हा झाडू खरेदी करा.
दरम्यान, धनत्रयोदशीच्या शुभ दिनी आपण गणेश, लक्ष्मी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पाच देवांची पूजा करावी. यामुळे आपल्या घरात कायम सुख समृद्धी नांदेल .