Budh Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो, माणसाचे भविष्य ग्रहांच्या स्थितीनुसार सांगितले जाते. 9 ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली रास बदलतात ज्याचा चांगला आणि वाईट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. म्हणूनच ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते. अशातच डिसेंबर महिन्यात बुध उलटी चाल चालणार असल्याने काही राशींवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
डिसेंबरमध्ये अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ज्ञान आणि बुद्धीची देवता बुधदेव यांचाही या यादीत समावेश आहे. 28 डिसेंबर रोजी बुध वृश्चिक राशीत वक्री अवस्थेत असेल. बुध जेव्हा वक्री अवस्थेत असतो तेव्हा तो उलटी चाल चालत असतो. बुधाच्या या हालचालीचा तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे.
या काळात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच करिअरशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायाचा देखील विस्तार होईल. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. चला तर मग जाणून घेऊया पुढील महिन्यात कोणत्या राशींवर बुध ग्रहाची कृपा असेल…
कन्या
बुध कन्या राशीच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल. या काळात कन्या राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. तसेच करिअरमध्ये फायदे होतील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. पुढे जाण्यासाठी हा काळ चांगला सिद्ध होईल.
वृषभ
वृषभ राशीच्या सातव्या घरात बुध भ्रमण करेल. ज्याचा वृषभ राशींना खूप फायदा होईल, तसेच नवीन वर्ष शुभ राहील. या काळात आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. मेहनत करत राहा. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. लग्नाची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. तसेच पदोन्नतीची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण उत्तम राहील. बुध राशीच्या चौथ्या घरात भ्रमण करेल. यामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच या काळात घर, वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. कुटुंबात शांतता राहील.