महिलांच्या आजारात कोबीचे ‘हे’ आहेत विशेष फायदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- सध्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक आजार होऊ लागले आहेत. महिलांवरही अतिरिक्त तणाव, धावपळ यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. भारतामधील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिसून येत आहे.

जीवनशैलीमध्ये होत चाललेले बदल, आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या, आणि काही अंशी आरोग्यास धोकादायक सवयी यामुळे ही कर्करोग उद्भवतो आहे.

पण जर या सवयींमध्ये परिवर्तन केले गेले, तर कर्करोग होण्याचा धोका पुष्कळ प्रमाणात कमी होऊ शकतो. आपल्या आहारात प्रथिनांनी परिपूर्ण पदार्थांचा समावेश असावा.

यासोबतच ‘क्रुसीफेरस’ भाज्या, प्रामुख्याने कोबी खाल्ल्याने स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. तसेच स्तनाचा कर्करोग झाला असल्यास, त्याच्या उपचारांच्या साईड इफेक्ट्स चा त्रास ही या अन्नपदार्थांमुळे कमी होण्यास मदत होते.

कोबी मध्ये असणाऱ्या ग्लूकोसिनोलेट्स नामक तत्वामुळे शरीरातील मेटाबोलिक एन्झाईम्स च्या पातळीमध्ये वाढ होऊन शरीरावरील सूज आणि इस्ट्रोजेन या हार्मोनची पातळी नियंत्रित होण्यास मदत मिळते.

कोबीच्या सेवनाने टाईप २ डायबेटीस रोखण्यासही मदत मिळते. कोबीमध्ये असणारे वीस निरनिराळे फ्लॅवेनॉइड्स आणि १५ निरनिराळे फेनोल्स उत्तम अँटी ऑक्सिडंट्स म्हणून प्रभावी आहेत

म्हणूनच हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी कोबीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवा. कोबीमध्ये फायबर देखील मोठ्या मात्रेमध्ये असून त्यामुळे शरीराची पाचनशक्ती सुरळीत राहण्यास मदत होते. परंतु ही सर्व माहिती प्राथमिक असून जास्तच त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणेच इष्ट ठरते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

 वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24