लाईफस्टाईल

Children Corona Vaccine : अखेर सरकारने उचलले मोठे पाऊल ! सुरु होणार लहान मुलांचे लसीकरण…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- Zydus Cadila ची तीन डोसची कोविड लस ZyCoV-D या महिन्यात राष्ट्रीय अँटी-कोरोनाव्हायरस लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाईल.

त्यामुळे आता भारतातील मुलांनाही लवकरच कोरोनाची लस मिळू शकणार आहे. सरकारने या लसीचे एक कोटी डोस अहमदाबादस्थित कंपनी Zydus Cadila ला कडून मागवले आहेत.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आरोग्य मंत्रालयाने जगातील पहिली DNA-आधारित कोविड लस स्वदेशी स्वरूपात सादर करण्यासाठी तयारीचे काम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. असे मानले जात आहे की देशाच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत ही लस सुरुवातीला दिली जाईल.

ZyCoV-D ही भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी मंजूर केलेली पहिली लस आहे.

एका अधिकृत सूत्राने सांगितले की, “केंद्राने Zydus Cadila ला ZyCoV-D च्या एक कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. एका डोसची किंमत सुमारे 358 रुपये आहे, ज्यामध्ये कर समाविष्ट नाही.

या किंमतीत एका डिस्पोजेबल जेट ऍप्लिकेटर ची किंमत समाविष्ट आहे, ज्याच्या मदतीने ही लस दिली जाते. मर्यादित उत्पादन क्षमतेमुळे, ही लस सुरुवातीला प्रौढांना दिली जाईल.”

Zydus Cadila च्या अधिकाऱ्यांनी सरकारला सांगितले आहे की कंपनी दर महिन्याला ZyCoV-D चे एक कोटी डोस देऊ शकते.

ही लस देण्यासाठी, फ्रंटलाइन कामगार आणि लसीकरणकर्त्यांना जेट ऍप्लिकेटर वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, कारण ही लस सुईने टोचली जात नाही. ZyCoV-D चे तीन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील.

केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या विषय तज्ञ समितीने (SEC) 12 ऑक्टोबर रोजी 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी Covaxin ला काही अटींच्या अधीन राहून आपत्कालीन वापराचे अधिकार देण्याची शिफारस केली.

Ahmednagarlive24 Office