Coconut sugar benefits : मधुमेही रुग्णही खाऊ शकतात ‘ही’ साखर, फायदेही जबरदस्त…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Coconut sugar benefits : खराब जीवनशैली आणि खराब आहारामुळे मधुमेहाची समस्या सामान्य बनली आहे. सध्या जवळपास प्रत्येक घरात एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मधुमेहाच्या रुग्णाला अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागते. मुख्य म्हणजे आहाराची. अशातच मधुमेहाच्या रुग्णाने साखर प्रामुख्याने टाळली पाहिजे.

मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णाला इच्छा असूनही साखरेपासून लांब राहावे लागते. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. आज आम्ही अशा साखरेविषयी सांगत आहोत, ज्याचे सेवन मधुमेही रुग्णही करू शकतात. ही साखर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानली जाते. जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करते. आम्ही ज्या साखरेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे कोकोनट शुगर. कोकोनट शुगरचा वापर आज झपाट्याने वाढत आहे. कोकोनट शुगरला पाम शुगर असेही म्हणतात.

कोकोनट शुगर म्हणजे काय?

कोकोनट शुगर नारळाच्या फुलांपासून बनते, नारळाच्या फुलातील रस काढून ही साखर तयार केली जाते. हे करण्यासाठी, सर्वप्रथम आपण नारळाच्या फुलातून रस काढतो. मग तो रस एका भांड्यात ठेवला जातो आणि गरम आचेवर शिजवला जातो. त्याचे पाणी कोरडे होईपर्यंत ते शिजवले जाते. सुकल्यानंतर जे उरते त्याला कोकोनट शुगर म्हणतात. कोकोनट शुगरमध्ये 35 चा ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो.

कोकोनट शुगरचे फायदे :-

कोकोनट शुगरचा उपयोग मधुमेह नियंत्रित करण्यासाठी केला जातो. यासोबतच याचा उपयोग वजन कमी करण्यासाठीही होतो. त्यात सामान्य साखरेच्या तुलनेत कमी प्रमाणात सुक्रोज आणि फ्रक्टोज असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये आढळणारे कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि लोहासारखे पौष्टिक घटक अनेक आजारांवर फायदेशीर आहेत.