अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आले (ginger) हे बाराही महिने घरात उपलब्ध असते. भाजीमध्ये चव वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे.
आपल्याकडे बऱ्याचदा खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा (ginger juice) करून दिला जातो. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आले हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी लाभदायक असतं. जाणून घेऊयात आलं खाण्याचे फायदे .
१) पित्तामध्ये आराम
दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाढणारी ऍसिडिटी व त्यातून होणारी मळमळ यात आराम पडतो. शस्त्रक्रियेनंतर मळमळ जाणवत असल्यास आणि उलटीचा देखील त्रास झाल्यास आलं हे सर्वात जालीम औषध मानलं जातं.
ब-याचदा कॅन्सर असलेल्या लोकांनर केमोथेरपी केली जाते, केमोथेरपी दरम्यान रूग्नांना होणा-या त्रासावर देखील आलं श्रेष्ठ औषध आहे. गर्भवती महिलांनी आलंच नाही तर कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
२) स्नायूंच्या दुखण्यांत आराम
व्यायामानंतर तुम्हाला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर आल्याच्या वापराने तुम्ही हा त्रास चुटकीसरशी दूर करू शकता. जर व्यायामामुळे तुमचे कोपर दुखत असेल तर दररोज २ ग्रॅम आल्याचं सेवन करून स्नायूंंचे दुखणे दूर करू शकता.
३) सांधेदुखीपासून सुटका
सांधेदुखी किंवा सांध्यांमध्ये अवघडलेपण येणं हा खूपच सामान्य आजार किंवा दुखणं आहे. या दुखण्यावर काहीच उपाय नसला तरी एका रिसर्च अनुसार काही लोकांनी गुडघेदुखी आणि सांधेदुखावर आल्याचा अर्क घेतला होता आणि त्या लोकांना त्याचा चांगला परिणाम झाल्याचा अनुभव आला होता. तसेच आलं, लाल मिरच्या, दालचिनी आणि तिळाचे तेल मिक्स करून लावल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.
४) मासिक पाळीतील वेदना कमी होते
आल्याच्या पावडरचं सेवन केल्याने मासिक पाळीच्या त्रासातून काही प्रमाणात सुटका मिळते. यासाठी दररोज न चुकता मासिक पाळीमध्ये एक ग्रॅम आल्याची पावडर खावी जेणे करून ओटीपोटात दुखणे, स्नायू दुखणे आणि अतिरक्तस्त्रावापासून आराम मिळतो.
ब-याचदा आलं टाकलेला गरमा गरम चहा किंवा आलं टाकून केलेल्या को-या चहात लिंबू पिळून प्यायल्यानेही मासिक पाळीतील वेदना कमी होऊ शकतात. तसेच अनियमित मासिक पाळी,पोटदुखीसाठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीनवेळा घ्यावे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews