Confirm Tatkal Ticket : मस्तच! आता सर्वात आधी तुम्हाला मिळेल रेल्वेचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सोपी पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Confirm Tatkal Ticket : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. तसेच भारताची सर्वात मोठी दळणवळणाची सोय म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी अनेकजण आगोदरच रेल्वे तिकीट बुक करत असतात.

मात्र अनेकांना ऐनवेळी तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेकजण तत्काळ तिकीट बुकिंगकडे वळतात. कारण अनेकजण तत्काळ तिकीट बुकिंगमुळे स्वतःचे तिकीट कन्फर्म करून घेतात. यासाठी अनेकांना जास्त पैसे द्यावे लागतात.

जर तुम्हालाही सतत रेल्वेने प्रवास करावा लागत आहे आणि तुम्हाला तिकीट बुकिंगचा त्रास होत असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता सर्वांच्या आगोदर तिकीट बुकिंग करू शकता.

तुम्हालाही सर्वांच्या अगोदर रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्हाला काही तापास फॉलो कराव्या लागतील त्यानंतर तुम्ही सहज तिकीट बुक करू शकता. तुम्हालाही लगेच तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही तत्काळ बुकिंगमध्ये कन्फर्म तिकिटे मिळवू शकता.

उच्च गती इंटरनेट प्रवेश

जर तुमचे रेल्वे तिकीट बुक करूनही कन्फर्म झाले नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही तत्काळमध्ये देखील रेल्वे तिकीट काढू शकता. तत्काळमध्ये रेल्वे तिकीट काढण्यास तुमच्याकडे हायस्पीड इंटरनेट असायला हवे.

जर तुमच्याकडे हायस्पीड इंटरनेट असेल तर तुम्ही सहज तत्काळमध्ये तिकीट काढू शकता. जर तुमच्याकडे स्लो इंटरनेट असेल तर तुमची प्रक्रिया मध्येच अडकते आणि तिकीट बुक होत नाही. त्यामुळे नेहमी हास्पीड इंटरनेट वापरावे.

तृतीय पक्ष अॅप्सचा वापर

जर तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन चांगले रेटिंग पाहिल्यानंतर कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावे लागेल. यामुळे तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

IRCTC लॉगिन आवश्यक आहे

तुम्हाला कन्फर्म तिकीट हवे असेल तर IRCTC लॉगिन असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल. त्यावर तुमचा आयडी तयार करून पासवर्ड सेट करावा लागेल.

यानंतर तुम्ही या वेबसाइटवरून तुमचे रेल्वे तिकीट सहज बुक करू शकता. तुम्हाला तुमचे कन्फर्म रेल्वे तिकीट हवे असेल तर जाण्याअगोदर IRCTC च्या वेबसाईट सतत तिकीट उपलब्धता तपासा.